दिवाळी आणि दिवाळीतील फराळ

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, दिवाळी म्हणजे कौटूंबिक मिलनाचा सण, दिवाळी म्हटली की बालगोपाळांच्या मस्तीच्या उधानाचा सण, दिवाळी म्हटले की नववस्त्रे परिधान करण्याचा सण, दिवाळी म्हटली की मातीच्या शिकोर्‍यांचा प्रकाश, दिवाळी म्हटली की रंगेबिरंगी आकाशकंदीलाचा सण, दिवाळी म्हटली की घरांच्या भिंतीवर मनमोहक रंगीत विद्यूत रोषणाई लावण्याचा सण, दिवाळी म्हटती की घराच्या दारात आणि देवघरात सुंदर सुंदर […]

प्रात: समयी : दीपावली पाडवा

दिवाळी पाडवा म्हटला की शास्त्रीय संगिताची व त्यातील सदाबहार गीतांची मैफील तर व्हायलाच हवी. दिवाळी पाडव्याच्या पहाटेच्या त्या रूणूझूणूत्या गुलाबी थंडीत सर्व वाद्ये आणि गायक किंवा गायीकेचा समुधर आवाजातील गाणे ऐकणे म्हणजे एक अर्वणीय संधीच होय. तबल्याचा नाद, गीताची लकेर आणि सनईचे सुर, उगवत्या दिनकराची अंगावर पडलेले पिवळेधम्मक किरणे….. व्वा..व्वा….. तर चला वाचू या अशाच […]

वादविवाद ते अभिनय : एक ‘अनुपम’ प्रवास

जळगावच्या रंगभूमीने अनेक कलावंत घडविले आहेत. विविध कारणांमुळे त्यातील अनेकजणांनी करीअरसाठी मुंबई पुण्याची वाट धरली तर काही जण संधी नसल्याने रोजीरोटी सांभाळून रंगभूमीची सेवा करत आहेत. वर्ष १९९२ – १९९३ जळगाव जिल्हा आणि राज्यभरात झालेल्या महाविद्यालयीन वादविवाद, वकृत्व स्पर्धा असो वा रंगभूमी. यावर आर. आर. विद्यालय आणि नूतन मराठा महाविद्यालयाच्या संघाच नाव कोरल जायचं. जळगाव […]

मागोवा : आठवणीतील दिवाळी…

दिवाळी आली ज्येष्ठांना त्यांच्या बालपणाच्या दिवाळीची आठवण हमखास येतेच. दुपारी नातवंडांना अंगाखांद्यावर मांडीवर खेळवत त्यांना त्यांच्या बालपणातील दिवाळीची गोष्ट सांगीतली जात असे. तर नातवंडही त्यांनी केलेल्या दिवाळीच्या नियोजनावर गप्पा होत. आता तो काळ गेला. गावाकडची ती घरेही गेलीत आणि अनेक बाबीही काळासोबत लुप्त झाल्यात. मात्र या दिवाळीच्या आठवणी आजही अनेकांच्या मनाच्या एका कोपर्‍यात ताज्या आहेत. […]

क.. कवितेचा.. माणुसकिना आधार

खान्देश कन्या म्हटले की डोळ्यासमोर नाव येते ते बहिणाबाईंचे. बहिणाबाई पुस्तकी शाळा शिकल्या नाहीत. मात्र त्यांनी पुस्तके लिहायला लावलीत. जात्यावर दळण दळता दळता, शेतात काम करता करता त्या कविता करत गेल्या आणि त्याचे पूत्र सोपानदेव त्या कविला लिहीत गेले. म्हणूनच आम्हाला बहिणाबाईच्या अनुभव आणि निरीक्षणातील जीवनाच्या शाळेच्या कविता वाचायला मिळाल्यात. बहिणाईंच्या कवितांचा आदर्श घेत धरणगावच्या […]

वैचारीक : मन तुझं शुध्द

सध्याची स्थिती पाहता सळसळणार्‍या तरूणाईवर आणि बालकांवर संस्कार होत असले तरी ते पुरेशे नसल्याचे दिसते. रावणाच्या ताब्यात असलेली सीता, भरसभेत वस्त्रहरण होत असलेली द्रौपदी आजही पदोपदी दिसत आहे. आजचा समाज शिक्षणाने प्रगत होत असतांना आजच्या महिलांच्या नशिबी सीता आणि द्रौपदीचे जीने का यावे? बाल्यावस्था ते किशोरावस्थेपर्यंत शुध्द असलेले मन असे कलुषीत का व्हावे? सर्व संमतीने […]

ग… गझलेचा : वाटा चुकल्या कातर संध्याकाळी

जळगावातील संगित क्षेत्रातील एक नामवंत नाव म्हणजे डॉ. संगिता म्हसकर. आता त्या पुण्यात स्थायीक झाल्या आहेत. शास्त्रीय गायनाचा वारसा बालपणापासून आणि तोही वडीलांपासून मिळाल्यांनंतर संगिता म्हसकर यांनी त्यातच करीअर करत पीएचडी पदवी प्राप्त केली. शास्त्रीय गायनासोबत त्या उत्कृष्ट अशा कवयित्रीही आहेत. गझल गायनात जरा कठिणच. गझल लिहीता लिहीता त्या गझलेचे गायनही त्या करतात. अशीच त्यांची […]

क… कवितेचा : सण चार निमिषांचा…..

सर्वाचा आवडता सण म्हणजे प्रकाशोत्सव. वर्षभर विविध कारणांनी बाहेर राहणारे या उत्सवास आर्वजून एकत्र येताता. चार दिवसात घर कसं गजबजून जाते. गोडधोड, मोठ्याचे हास्यविनोद, लहानग्यांची चिवचिवाट , सारे कसे आनंदीआनदच. हाच आनंद काव्यरूपात मांडत आहेत जळगावचे कवी विवेक चौधरी…. सण चार निमिषांचा या काव्यातून… पडे अंगणात सडा, दारा सजली रांगोळी..महाउत्सवाचा सण, आली आली हो दिवाळी.. […]

स्टार्ट अप ३ : केटरींग रोजगाराचा सुवर्णपथ

हल्ली जो तो नोकरीसाठी शिकत असतो. उच्च पदवी घेणार्‍या प्रत्येकास चांगल्या पगाराची नोकरी मिळतेच असे नाही. त्यामुळे ज्यांना नोकरी मिळाले नाही त्यांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित होतो. ज्याला नोकरी मिळाली तो आणि त्याच्या परिवारातील पाच दहा जण खुश होतात. मात्र एक असा व्यवसाय आहे की ज्यात तुम्ही नोकर न बनता मालक होतात आणि स्वत:बरोबर […]

जरा हसू या : ‘कोरोना’ ते ‘करो ना !’

१४ मार्च २०२०.. स्थळ दिल्लीतील केंद्रस्थानी…. वेळ अशीच नेहमीची.. आणि मन की बात सुरू होते. मन की बात मध्ये सांगितले जाते कोरोना मुळे देशावर मोठे संकट आले आहे. त्यामुळे मे २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषीत करण्यात आले. आणि पाहता पाहता रेल्वे, बस, विमाने, दुकाने, शाळा महाविद्यालये, बगिचे, मंदिरे, बाजारपेठांना पटापटा कुलूपे लागु लागली. असा कोण लागून […]