मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५ हजार कोटीच्या घोटाळ्या प्रकरणी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्यासह ६९ जणांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ‘ क्लिन चिट’ दिली आहे. तर याबाबत क्लोजर रिपोटही न्यायालयात सादर केला आहे.
सन २०११ मध्ये २५ हजार कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने तत्कालीन संचालक मंडळावर ठपका ठेवत संचालक मंडळ बरखास्त केले होते. यात संचालक अजित पवार यांच्यासह ७० जणांवर कलम ४२०, ५०६,४०९,४६५ आणि ४६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. २५ हजार कोटींची कर्जे नियमबाह्य पध्दतीने वितरीत केल्याचा आरोप होता.
सर्व लोकप्रतिनिधींना दिलासा
पोलिसांनी सर्व संचालक मंडळाला क्लिन चिट देत न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केल्याने या सर्व संचालक मंडळास मोठा दिलासा मिळाला आहे.