वाचनीय

शिवकॉलनीत आयपीएल वर सट्टा : दोघांना अटक

आर्थिक
October 8, 2020

१० मोबाईलसह १ लाख २७ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव : येथील शिवकॉलनीतील गंगासागर अपार्टमेंटच्या तळमजल्यावर आयपीएलवर ऑनलाईन सट्टा घेणार्‍या दोघांवर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून अटक केली आहे.

त्यांच्याकडून १० मोबाईल सह सुमारे १ लाख २७ हजार रूपये हस्तगत केले आहेत.
योगेश प्रदीप महाजन ( वय २६) यांच्या घरात केकेआर विरूध्द सीएसके या आयपीएल क्रिकेट सामन्यावर मोबाईलवर ऑनलाईन सट्टा घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने धाड टाकून योगेश महाजन व राजेंद्र श्रीराम पाटील (३९,रा. गुरूदत्त कॉ.) या दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून टीव्ही. सेट टॉप बॉक्स, रिमोट, पेनड्राईव्ह, लॅपटॉप व १० मोबाईल असा १ लाख २७ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. रामानंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहेम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि स्वप्नील नाईक,उपनिरीक्षक अंगद नेमाणे, विजयसिंग पाटील, अनिल जाधव, सविता परदेशी तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts