वाचनीय

व्यर्थ न ठरले हे बलिदान - भाग 8...

ब्लॉग
August 6, 2020

व्यर्थ न ठरले हे बलिदान – भाग 8…

1992 साली बाबरी मशिदीचे पतन झाले. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया वेग घेईन असे वाटले होते. प्रत्यक्षात सत्ताधार्‍यांची इच्छाशक्ती 2014 नंतर दिसली आणि त्यानंतर मात्र न्यायालयापुढे गांभीर्याने राममंदिर बाबरीमशिद हा खटला सुरु झाला. अनेक अडथळे पार करत खटला पुर्णत्वाला गेला. निकाल लौकीकदृष्ट्या हिंदूंच्या बाजूने लागला असे म्हटले जाते. प्रत्यक्षात हा निकाल ना हिंदूंच्या बाजूचा ना मुस्लिमांच्या विरोधात आहे. हा निकाल म्हणजे करोडो भारतीयांच्या श्रद्धांना बळकटी देणारा आहे. रामायण, महाभारत किंवा तत्सम हिंदूंच्या पौराणिक किंवा कोणत्याही घटनांकडे काल्पनिक म्हणून पाहण्याची सवय गेल्या काही वर्षात तथाकथीत पुरोगाम्यांना जडलेली आहे. न्यायालयाचा खरा आघात त्यांच्यावर आहे. हा निकाल भारतातील लोकशाही बळकट असणारा पुरावा देतो. करोडो भारतीयांची अतुट श्रद्धा असूनही त्यांना 500 वर्ष झगडावे लागते. न्यायालयात जावे लागते. वर्षानूवर्षे तारखांवर तारखा पडत राहतात आणि तरी हिंदू कोणत्याही गैर मार्गाला न लागता न्यायालयीन लढा देत राहतात. हेच हिंदूंच्या सहिष्णूतेचे दर्शन आहे. मुख्यमंत्री मुलायमसिंग यांनी त्याकाळात श्रीराम मंदिर निर्माणाच्या विरोधात जी कृत्ये केली तीचा परिणाम समाजमनावर झाला आणि त्याची परिणीती मुलायमसिंग यांच्या राजकीय अधःपतनात झाली. असो.
अखेर, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य श्रीराम मंदिराचे भुमीपूजन होत आहे. सगळ्या जगाचे लक्ष्य अयोध्येकडे लागले आहे. कारण, हे फक्त भुमीपूजन नाही तर भारतीयांच्या अस्मितेच्या पूनर्निर्माणाचे प्रतिक आहे.
(लेखमाला समाप्त)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts