वाचनीय

वसईतील ९० वर्षीय शिक्षिकेने केली विद्यार्थी मुख्यमंत्र्यांकडे मदतीची याचना…

ताज्या घडामोडी
May 27, 2021

वसईतील एका वृद्धाश्रमात राहणार्‍या एका ९० वर्षीय शिक्षिकेने तीच्या विद्यार्थी मुख्यमंत्र्यांकडे मदतीची याचना केली आहे. ही याचना केवळ तिच्या एकटीसाठी नसून तीच्या सारख्या काही निराधार वृध्दांसाठी आहे. का मागितली असावी बरे मुख्यमंत्र्यांकडे मदत….


दादरच्या बालमोहन विद्यामंदिरात सुमन रणदिवे या शिक्षिका म्हणून नोकरीस होत्या. त्यांनी मुख्यमंत्री उध्दव
ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना त्यांनी शिकवलं आहे. १९९१ मध्ये त्या निवृत्त झाल्या. पतीच्या आणि मुलाच्या निधनानंतर सुमन रणदिवे यांनी वृद्धाश्रमात आश्रय घेतला. वसईतील सत्पाळा गावातील “न्यू लाईफ केअर” या वृद्धाश्रमात त्या राहत आहेत.


सुमन रणदिवे यांच्यासोबत वृद्धाश्रमात २५ हून अधिक वृद्ध राहतात. तौते चक्रीवादळामुळे असलेल्या वृद्धाश्रमाचे पत्रे उडाले असून इतरही नुकसान झालं आहे. पत्रे उडून गेल्यामुळे सर्व सामान, कपडे, कागदपत्रंही भिजली असून सर्वांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. वादळ जाऊन दहा दिवस झाल्यानंतरही अद्याप त्यांना मदत मिळालेली नाही. यामुळे सुमन रणदिवे यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली आहे.


चक्रीवादळामुळे वृद्धाश्रमाचं खूप मोठं नुकसान झालं आहे. छप्पर उडालं असल्याने आम्हाला रात्री झोपायला त्रास होतो. उद्धव बेटा मला तुला भेटायचं आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असताना मी शिकवलं होतं. कृपया आम्हाला मदत कर, अशी आर्त हाक सुमन रणदिवे यांनी दिली आहे.


वृद्धाश्रमाच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास आठ ते दहा लाखांचं नुकसान झालं आहे.


आधीच करोनाचं संकट असताना त्यात तौते चक्रीवादळामुळे डोक्यावर छप्पर नसल्याने सध्या हे सर्व वृद्ध अनेक आव्हानांचा सामना करत आहेत. वेळीच मदत मिळावी अशी अपेक्षा ते व्यक्त करत असून पावसाळ्याआधी सर्व काही पुन्हा ठीक व्हावं अशी आशा करत आहेत.
बघु या बरे या तीन्ही दिग्गज नेत्यांपैकी कोण धावून येतेय आपल्या शिक्षिकेला मदत करण्यासाठी….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts