पंढरपुर : मराठा आरक्षणास न्यायालयाने स्थगीती दिली आहे. त्यामुळे याबाबत ठाकरे सरकार आणि केंद्र सरकार यांची मदत घेणार आहे. यातून घटनात्मक पेच सोडविण्यासाठी वेळ पडल्यास घटनेत दूरूस्ती कशी करता येईल याचा अभ्यास सुरू असल्याची माहिती खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी दिली.
पंढरपूर येथे पूर पाहणीसाठी आले असता त्यांनी ही माहिती दिली. मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे. मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचे मागासवर्गीय आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या कायद्याला मंजुरी दिली आहे. तो पारित झाला असून हायकोर्टानेही त्याला मान्यता दिली आहे.
तरीही मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर केंद्र सरकारची काही हालचाल असेल आणि घटनेत दूरूस्ती करायची असेल तर त्या दृष्टीनेही माझा अभ्यास सुरु आहे. घटना बदल केल्यास तो विषय देशासाठीच लागू होईल” असंही संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.