वाचनीय

मनातलं : स्त्री हृदयातील आक्रोश

दिवाळी विशेष २०२०
November 12, 2020

हाथरस, निर्भया आणि आता पारोळा अशा सततच्या होणार्‍या घटनांमुळे आज देशाच्या, राज्याच्या, शहराच्या आणि गावातल्या कोणत्या ना कोणत्या कानाकोपर्‍यात स्त्रीयांचा आक्रोश येत असतो. शिक्षणाने. विज्ञानाने व्यक्ती प्रगत झाली असली तरी तीच्यातील अत्याचाराची भावना अजूनही नष्ट झालेली नाही. अशा घटनांमध्ये आरोपी म्हणून ज्यांची नावे समोर येतात त्यांना आणि त्याचे वय पाहीले तर भयंकर चिडही येते आणि चिंताही वाटते. या किशोरावस्थेत मजेत केलेले हे गुन्हे किती गंभीर आहेत याची जाणिवही त्यांना नसावी. येथे कोठेतरी आपण कमी पडत असल्याचे प्रकर्षाने जाणवतेय. आई-बाप.. होय आई-बाप आपल्या पोराच आयुष्य सुखाच जाव म्हणून रक्ताच पाणी करतात. पण त्याची जाणिव या पोरांना कोठे असते. केलेले संस्काराना मुठमाती देत ही मुले स्वत: बरोबर आपल्या जन्मदात्यांनाही काळा डाग लावत असतात हे त्यांना सांगणे गरजेचे आहे. असाच स्त्रीचा आक्रोश मांडताहेय नाशिकच्या अलका दराडे या.. वाचू या काय आहे तो स्त्रींयाचा आक्रोश….

आक्रोश म्हटल की, डोळ्यासमोर पोटतिडकीने आपल्या अंत:करणातील वेदना व्यक्त करणार्‍या स्त्रीयांचे चेहरे दिसतात. या स्त्री आक्रोशाची व त्यावरील अत्याचाराची अनेक उदाहरण आपण रामायण,महाभारतातही पाहिली. रावणाने सीतेचे फसवून हरण केले. परंतू आजच्या रावणांसारखे अत्याचार त्याने सीता प्रत्यक्ष ताब्यात व असहाय असूनही तिच्यावर अत्याचर केले नाहीत. राम पवित्र सीतेला लंकेतून परत घेऊन गेला.

आजचे रावण मात्र अमानुष व कृतघ्न झालेले आहेत. आजच्या आधुनिक युगात स्त्री सबला व कर्तूत्वान झाली असे आपण म्हणतो. परंतू अशा काही महिला आहेत की त्या या नराधमाच्या दृष्ट अत्याचाराला बळी पडतात. केलेले दृष्कृत्य समोर येवू नये म्हणून त्यांची हत्याही करतात. माणासाने गाठलेला हा निचतेचा कळस आहे.


उत्तर प्रदेशात वाल्मिकी समाजातील स्त्री हृदयाचा आक्रोश समोर आला. संपूर्ण देशाला या घटनेने हादरवून सोडल. प्रचंड पडसद देशभर उमटले. हाथरस मधील बुलगढी गावातील वाल्मिकी समाजाच्या एकोणीस वर्षीय निष्पाप मुलीवर 16 सप्टेंबर रोजी चार जणांनी हिंस्त्र पशूसारखा सामुहीक अत्याचार केला. कहर म्हणजे त्यातील एक आरोपी तर अल्पवयीन आहे. हे चारही आरोपी ठाकूर जमातीचे आहेत. अत्याचार करणार्‍या या नराधमांनी तिच्या शरीराचे अमानुषपणे हाल करून तिची जिभ देखील कापली. अंगावर काटा आणणार्‍या अशा अनेक घटना घडतात. पण त्यातील अशी एखादीच घटना समोर येते.

रुग्णालयात बेटी वासनेच्या भक्ष्यस्थानी पडली होती. वाल्मिकी व ठाकूर समाजातील व्दंद निष्पाप मुलीला महागात पडल.याही पुढचा कळस म्हणजे तिच्या मृतदेहाचा ताबा नातलगांना मिळाला नाही. त्यांना तिला पाहताच आले नाही. पोलिसांनी तिच्या कुटुंबाची संमूती न घेताच मध्यरात्री कोणतेही विधी न करता तिच्या मृतदेहावर अंतिम संस्कार केले. घरातील एकही सदस्य उपस्थित नव्हता. हे सर्वच चक्रावून टाकणारं व अंगावर शहारे आणणारं आहे. अनेक पडसाद उमटलेत अगदी तळागाळातून.


या घटनेनंतर वाल्मिकी समाजातील अनेक कुटूंबांनी धर्मांतर केलं. समाजाच्या संरक्षणासाठी बाळासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकरांच्या उपस्थितीत हे हे धर्मांतर झाले. पण धर्मांतर हा काही उपाय नाही. यात महिला व बालकंही आहेत. 236 जणांनी बौध्द धर्म स्विकारला.
मुलींच्या दु:खी कुंटुंबास भेटण्यासाठी कोणालाच जाऊ देण्यात येत नव्हते. जणू त्यांना सांत्वनाची गरजच नव्हती. राहूल गांधी व प्रियांका गांधीनाही रोखण्यात आले.पोलीसांच्या झटापटीत राहूल गांधी खाली पडले. सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाल्यावर ठराविकच लोकांना जाऊ देण्यात आले. राहूल गांधी परत त्यांना भेटण्यास गेले तेव्हा मनाला चटका लावणारा आक्रोश समोर आला.

उत्तर प्रदेशावर त्यांनी निशाणा साधला. इतरही अनेक राजकीय नेते सांत्वनासाठी गेले. सर्वत्र पोलिसांची अरेरावी व दंडुकेशाही आपण टिव्हीवर पाहीली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री या खळबळजनक घटनेमुळे मोठे अडचणीत आले आहेत. महिलांवरील अत्याचाराशी संबंधीत प्रकरण ते ज्या पध्दतीने हाताळत आहेत, त्यावरून त्यांना जोरदार फटका बसला आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयात व ंनतर सर्वोच्च न्यायालयात गेलं.

निकालावर सर्वांची कडी नजर असली तरी वाल्मिकी समाजातील निष्पाप मुलगी मात्र भक्ष्यस्थानी पडली हे सत्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली खटला चालेल.


स्त्री जीवनाचे कठोरतेचे अनेक काटे आहेत. अनेक वासनामय नजरा तिला न्याहाळत ओत. हे सर्व संपावे असे पोटतिडकीने वाटतं की, हृद्यातील हा पेटता आक्रोश कधी संपेल हे सांगता येत नाही.

सौ. अलका सी. दराडे
नाशिक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts