रावेर : येथून जवळ असलेल्या बोरखेडा हत्याकांडाचा खटला जलद न्यायालयात चालविण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. यासाठी विशेष सरकारी वकिल म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी पीडितांचे सांत्वन करतांना सांगितले.
चारही अल्पवयीन मृत मुलांवर आज शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडित कुटूंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी हा खटला जलद न्यायालयात चालविला जाणार असून विशेष सरकारी वकिल म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
शासकीय मदत देणार
पीडित कुटूंबास घरकुल,आर्थिक मदत आणि शेत जमीन देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.