रावेर : तालुक्यातील बोरखेडा येथे झालेल्या हत्याकांडातील मृत चारही अल्पवयीन मुलांवर आज पोलिस बंदोबस्तात शोकाकुल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले.
काल रात्री सविता मैताब भिलाला, राहूल भिलाला, अनिल भिलाला व सुमन भिलाला या चार भावंडांची कुर्हाडीने वार करून हत्या झाली होती. यातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर तिचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
उर्वरित तिन्ही भावंडांचे शवविच्छेदन झाल्यानंतर चौघांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात आदिवासी परंपरेनुसार दफनविधीचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरिक्षकांसह माोठा पोलीस बंदोबस्त होता. लोकसंघर्ष मोर्च्याच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदेही उपस्थित होत्या दरम्यान याप्रकरणी पाच संशयीतांना ताब्यात घेतले असून तीघांनी खुनाची कबुली दिली आहे. हे तीघेही अल्पवयीन आहेत.