वाचनीय

पु.भा. भावे, रिया चक्रवर्ती आणि सुशांतसिंग प्रकरण

ताज्या घडामोडी, ब्लॉग
August 14, 2020

पु.भा. भावे, रिया चक्रवर्ती आणि सुशांतसिंग प्रकरण

हेडींग वाचून चक्रावले असाल ना! हिंदूत्ववादी पु. भ. भावे यांचा सुशांतसिंगशी काय संबंध?

गोंधळू नका.. पण, भावे यांचा खालील लेख वाचल्यानंतर निश्‍चितच तुमच्या लक्षात येईल, काय आहे ते!

पत्रकार कथालेखक, नाटककार, कादंबरीकार इतिहासप्रेमी आणि या व्यतिरिक्त अनेक रूपे आवश्यकतेनूसार धारण करणारे चतुरस्त्र लेखक आणि कडवे सावरकरभक्त कै. पु. भा. भावे यांची आज 41वी पुण्यतिथी. आज अनेक वाचक त्यांचे स्मरण करत असतात. आपलाही स्मरण करण्याचा मार्ग थोडासा वेगळा आहे. जो आजच्या पिढीला लागू पडतो. 1980 साली भावे यांचे निधन झाले. आयुष्यात त्यांनी लिखाणाचे सर्व प्रकार समर्थपणे हाताळले. त्यांनी 1970 साली जाऊ मी सिनेमात…? या नावाचा एक लेख लिहीला. 1970 सालच्या ऑगस्ट महिन्याच्या जत्रा मासिकात हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यानंतर घणाघात (मोरया प्रकाशन, मुंबई) या पुस्तकात तो आहे. या लेखातील एक परिच्छेद खाली दिला आहे. आजच्या पिढीला हि भाषा जरा जड वाटेल. पण 1970 साली भावे यांनी जे विचार मांडले, वस्तुस्थिती सांगितली. त्यात 50 वर्षानंतर आज काही बदल झाला आहे? खालचा परिच्छेद वाचा. म्हणजे आज जोरदार गाजत असलेले सुशांतसिंग राजपूत – रिया चक्रवर्ती प्रकरण लक्षात येईल.
चार सात्विक संसारी माणसे ज्याला सुख मानतात, त्याची निपज चित्रसृष्टीत होत नसते. ही सगळी सृष्टीच उलटी आहे. इथले संस्कार उलटे आहेत. वळण वाकडे आहे. आपण ज्याला सदाचार म्हणतो, तो इथे जगू शकत नाही. इथे नवर्‍याच्या बायकोला, दुसर्‍या कुणा पुरुषाला नवरा म्हणावे लागते. त्याच्याशी शृंगाचेष्टा कराव्या लागतात. प्रकटपणे जवळचे स्पर्श करावे लागतात. (एकांतात काय करावे लागते ते प्रख्यात आहे.) ह्याचा हाडामासांच्या माणसावर काहीच का परिणाम होत नसेल? सर्वसामान्य नट काय शुक, भीष्म असतो? सर्वसामान्य नटी काय सती-सावित्री असते? सती सावित्रीदेखील इथे ठिकाणावर राहू शकणार नाही. येथे अनेकदा बाप मुलीचे भांडवल करतो. भाऊ बहिणीला ओळखत नाही. बायको नवर्‍याला विसरते. नवर्‍यांचे नवरेपण संपुष्टात येते. दुराचारांत जमा होणार्‍या अनेक गोष्टी येथे मुळी गृहित धरल्या जातात. नायकाचे नायिकेशी लफडे ना? ते तर असणारच! आज एक नायक, उद्या दुसरा नायक, परवा तिसरा! निर्माता, दिग्दर्शक, छायालेखक आणि कधीकधी रंगभूषाकारदेखील नायिकेकडून आपली फी वसूल करणारच! व्यभिचाराचे येथे कुणाला सोयरसुतक नाही. दारुच्या येथे नद्या वाहतात. फसवणुक हा नेहमीचा व्यवहार आहे. प्रथम दुसर्‍याची फसवणूक आणि शेवटी स्वतःची फसवणूक! दुसर्‍याला फसविता-फसविता शेवटी आपणच भयंकर फसतो हे फार उशिरा लक्षात येते. तेव्हा वेळ टळून गेलेली असते. सुख,शांतीची दारे बंद झालेली असतात. मग शांती शोधायची झोपेच्या गोळ्यांत! पिस्तुलाच्या गोळ्यांत! नदीत, विहीरीत, फाशीच्या दोरीत!
असे हे विपरीत जग आहे. येथे परिस्थितीच अशी आहे. मोहच इतके आणि असे आहेत की, सरळ काही होऊच शकत नाही. मद्य, मदिराक्षी, किर्ती, संपत्ती! एकापेक्षा एक मोह! येथे सारे काही फार मिळते असे माणसाला वाटते, पण अंती लक्षात येते की, येथे सारे काही फार जाते! मिळालेला पैसाही पुष्कळदा टिकत नाही. येतो तसा जातो.

हा परिच्छेद भावे यांनी जसा काही रिया चक्रवर्तीलाच डोळ्यापुढे ठेवून लिहीला असावा असेच वाटते.

काय… पटला की नाही मजकुर… सिनेसृष्टीत आजही काही बदल झाला आहे?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts