जळगाव : येथील नवी पेठेतील युवकाचा बाथरूमध्ये पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला आहे. सचिन राधेश्याम राणा ( वय ३९) असे या युवकाचे नाव आहे.
सचिन पहाटे साडेपाचच्या सुमारास अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले असता त्यांचा पाय घसरून ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. परंतू तब्येत गंभीर असल्याने त्यांना शिरसोलीकडील देवकर वैद्यकिेय महाविद्यालयात नेले असता तेथे त्यांना मृत घोषीत करण्यात आले.
त्यांच्या मागे पत्नी व लहान मुलगी आहे. याबाबत पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.