वाचनीय

धक्कादायक : कोरोनामुळे तीन महिन्यात देशभरातील ५७७ मुले अनाथ...

Uncategorized
May 26, 2021

कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झाल्याने गेल्या तीन महिन्यात देशभरातील ५७७ मुलं अनाथ झाली आहेत.


महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी ही माहिती दिली आहे. १ एप्रिलपासूनची आकडेवारी असून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून गोळा करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. करोनामुळे आई आणि वडील दोघांनाही गमावलेल्या प्रत्येक असहाय्य मुलाला पाठिंबा तसंच संरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.

The Union Minister for Women & Child Development and Textiles, Smt. Smriti Irani delivering the keynote address at a Webinar on “A Movement Towards Atmanirbhar Bharat-Competitiveness and Manufacturing of PPEs”, organised by the Institue for Competitiveness (IFC), in New Delhi on December 11, 2020. The Secretary, Textiles, Shri Ravi Capoor is also seen.


भारत सरकार करोनामुळे आपले दोन्ही पालक गमावलेल्या असहाय्य मुलांना पाठिंबा आणि संरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. १ एप्रिल ते आज दुपारी २ वाजेपर्यंत, राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या माहितीनुसार ५७७ मुलांनी आपल्या पालकांना करोनामुळे गमावल्याची माहिती दिली आहे, असं स्मृती इराणी यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे.


या मुलांना वाऱ्यावर सोडलं जात नसून जिल्हा प्रशासनाच्या अख्त्यारित सुरक्षा दिली जात असून लक्ष ठेवलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर अशा मुलांना समुपदेशन हवं असेल तर नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स त्यासाठी तयार आहे.
या मुलांची देखभाल करण्यासाठी निधी कमी नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

मुलांसंबंधी केंद्र सरकार सतत राज्यं आणि जिल्ह्यांसोबत संपर्कात आहे. त्यांच्या कल्याणासाठी निधीची अजिबात कमतरता नाही. महिला आणि बालकल्याण मंत्रालयाची सर्व भागधारकांसोबत बैठक पार पडली आहे. यामध्ये युनिसेफचाही समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


महिला आणि बालकल्याण मंत्रालय करोनामुळे पालक गमावलेल्या मुलांची माहिती मागत असतानाही अनाथ मुलांबद्दल चर्चा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून ती मिळत नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.


पालकांनो वेळीच काळजी घ्या आणि आपल्या मुलांना अनाथ होण्यापासून वाचवा. कोरोनाचे नियम पाळा, कुटूंबाची काळजी घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts