वाचनीय

जीडीपी ९.५ टक्क्याने घसरूनही व्याजदर राहणार जैसे थे : शक्तिकांत दास

आर्थिक
October 9, 2020

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे देशात निर्माण झालेली भीती आणि निराशेच्या वातावरणामुळे आर्थिक वर्ष २०२०-२०२१ च्या चौथ्या तिमाहीत जीडीपीवर सकारात्मक परिणाम दिसतील. सध्या जीडीपी ९.५ टक्क्याने घसरण्याची शक्यता दिसत असली तरी व्याजदारात मात्र कोणतेही बदल झालेले नाहीत. अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी दिली.

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक पार पडली. त्याची माहिती त्यांनी दिली. रेपो दरात कोणतेही बदल नसून ते ४ टक्क्यांवर कायम ठेवले आहेत. आगामी काळातही महागाई दर अपेक्षेपेक्षा अधिक राहणार असून करोना महासाथीच्या संकटामुळे मागणीदेखील कमीच राहण्याची भीती आहे.

निर्यातीला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने परदेशी खरेदीदारांशी करार करण्यासाठी अधिक सुविधा जाहीर केल्या आहेत. सिस्टम आधारित ऑटोमॅटिक कॉशन लिस्टिंगच्या मदतीनं याप्रकरचा धोका कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

करोना महासाथीच्या काळात अर्थव्यवस्था निर्णायक स्थितीत प्रवेश करत आहे. जीडीपी वाढीचा दर उणे ९.५ टक्के असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर सप्टेंबर महिन्यात पीएमआय वाढून ५६.९ झाला आहे. जानेवारी महिन्यानंतर तो सर्वाधिक आहे. याव्यतिरिक्त छोट्या कर्जदारांना ७.५ कोटी रूपयांच्या कर्जाला मंजूरी देण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

करोना विषाणूच्या महासाथीमुळे अनेक गोष्टींवर मोठा परिणाम झाला आहे. परंतु आमची पुढे जाण्याची जिद्द कायम आहे. सध्या आव्हानं कायम आहेत. परंतु आपण त्यांना नक्कीच पार करू. आपण करोनाचा अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम दूर करून पुन्हा आर्थिक वृद्धीच्या मार्गावर जाऊ असा विश्वास श्री. दास यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts