जळगाव : येथील अक्सानगरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी खिडकीची जाळी तोडून घरातून ५० हजार रूपये आणि सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. दरम्यान हा प्रकार शेजारच्या तरूणाने उघडकीस आणला.
गुलशन ए हिंद या हॉटेलच्या मागे हारून मुसा पटेल यांचे दुमजली घर आहे. ते पत्नी, मुलगा, मुलगी, जावाई व नातवंडासह राहतात. काल रात्री ते ११ वाजता जेवण करून खालच्या मजल्यावर झोपले होते. घरात चोरी झाली आहे हे त्यांनाही माहित नव्हते.
त्यांच्या घराशेजारी राहणार्या युवकाला वरच्या घराच्या खिडकीची जाळी तुटलेल्याचे पटेल यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी वरच्या खोलीत जात पाहणी केली असता चोरीची घटना उघडकीस आली. यात ५० हजार रूपये व सोन्याचे दागिने चोरल्याचे समजले. याबाबत पोलिसात नोंद करण्यात येत आहे.