वाचनीय

जगातील या पहिल्या मिसाईल मॅनचा आज आहे वाढदिवस

राजकिय
November 20, 2020

म्हैसुर संस्थानचा होता राजा, १८ व्या वर्षीच इंग्रजांना हरवले

जगभरातील सैंन्यांकडे जेवढे अत्याधुनिक मिसाईल क्षेपणास्त्रे आहेत त्या सर्वांचे मूळ भारतात आहेत. या मिसाईल क्षेपणास्त्रांचा शोध एका भारतीय राजाने लावला आहे. त्यामुळे त्यांना मिसाईल मॅन म्हणून संबोधले जाते. याने वयाच्या १८ व्या वर्षीच इंग्रजांना लढाईत हरविले होते. अशा या पहिल्या मिसाईल मॅनचा आज वाढदिवस.


कर्नाटकच्या देवनहल्ली येथे 20 नोव्हेंबर 1750 रोजी जन्मलेल्या या राजपूत्राचे पूर्ण नाव सुलतान फतेह अली खान शहाब होते.


त्याच्या वडिलांचे नाव हैदर अली आणि आईचे फक्रुन्निसन. त्याचे वडील म्हैसूर साम्राज्याचे सैनीक होते परंतु त्यांच्या बळाच्या जोरावर ते 1761 मध्ये म्हैसूरचे शासक बनले. इतिहासामध्ये सुलतान केवळ एक योग्य शासक आणि योद्धा म्हणून नव्हे तर एक अभ्यासक म्हणून पाहतात.
त्याचे शौर्य पाहून प्रभावित झालेल्या त्याचे वडील हैदर अली यांनी त्यांना शेर-ए-म्हैसूर ही पदवी दिली. इंग्रजांशी लढताना श्रीरंगपट्टनम चा बचाव करताना 4 मे 1799 रोजी या सुलतानचा मृत्यू झाला.


सुलतान हा जगातील पहिला क्षेपणास्त्र मनुष्य मानला जातो. टीपू सुलतानचे रॉकेट्स लंडनच्या प्रसिद्ध विज्ञान संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. 18 व्या शतकाच्या शेवटी ब्रिटीशांनी हे रॉकेट आपल्याबरोबर घेतले.


टीपूने वयाच्या 18 व्या वर्षी इंग्रजांविरुद्ध पहिले युद्ध जिंकले.


‘पलकक्कड किल्ला’ हा ‘टीपूचा किल्ला’ या नावाने देखील प्रसिद्ध आहे. हे पलक्कड शहराच्या मध्यभागी आहे. हे 1766 मध्ये बांधले गेले. हा किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत संरक्षित स्मारक आहे.

इतिहासाच्या पानांमध्ये टीपू सुलतान यांच्या नावाबद्दल वाद होत असले तरी टीपू सुलतान यांचे नाव इतिहासाच्या पानांतून पुसणे अशक्य आहे हे नाकारता येणार नाही
सुलतान या नावाने ओळख पटणार नाही. पण टिपू सुलतान म्हणताच त्यांची ओळख पटणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts