फसवणुक कशा कशा मध्ये आणि कशाप्रकार होऊ शकते. याची रोज नवनविन शोध पोलिस यंत्रणा लावत आहे. फसवणुकीचा गुन्हा उघड झाल्यानंतर पोलिसही चक्रावून जातात. पण शेवटी पोलिस त्याचा छडा लावून आरोपीला तुरूंगात पाठवतातच.
फसवणूकीसाठी विवाह हा सर्वात मस्त आणि चांगला पर्याय असल्याचे यावल येथील एकीच्या लक्षात आले. तीने तीन चार जणांसोबत घेत स्वत:च्याच विवाहाचा बाजार मांडला. या तीन जणांतर्फे परिसरात विवाहासाठी मुलगी, बहिण, नातवाईकाची मुलगी असल्याचे सांगून मुलांची स्थळे शोधत असत.
मध्यमवर्गीय मुलाचे स्थळ शोधल्यानंतर मुलगी चांगली आहे. विवाह करायचा असेल तर मुलीच्या वडिलांना पैसे द्यावे लागतील असे हे मध्यस्थ सांगत.त्यांच्या या भूलथापांना काही जण बळी पडत. मुलामुलीची पसंती होताच लग्नाचा बार उडवून देत. लग्नात वधूच्या अंगावर सोन्याचांदीचे दागिणे, भारीतील साड्या, मोबाईल अशा वस्तू वधुला मिळत होत्या. मोठ्या धामधुमीत विवाह व्हायचा. नववधु नांदावयास घरी यायची. पाच दिवस राहयची. आणि तिच्या माहेरचे तीला चार दिवसांसाठी घेवून जातो असे सांगून तर कधी ती स्वत: विविध कारणे सांगुन तीला मिळालेले सोन्याचांदीचे दागिणे, मोबाई आणि काही पैसे, साड्या असे घेवून ती पोबारा करायची.
सासरचे तीला, तीच्या कथित नातेवाईंकांना फोन करायचे तर अशा नावाचे कोणीच नाही. हा नंबर तुम्हाला कोणी दिला.असे सांगून फोन करणार्यास पोलिसांचा धाक दाखवत असत. त्यामुळे फसवणूक झालेलाही शांत बसायचा.
एका घरातून दागिणे घेवून पळालेली ही नववधु लगेच दुसर्या जिल्ह्यातील दुसर्या वरासोबत विवाहबध्द होत असे. तेथेही पाच सहा दिवस राहून तेथून पोबारा करत असे. सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल यांची ते आपापसात विभागणी करत.
अखेर पोलिसांनी पकडलेच
यावलच्या महाजन गल्लीतील एका युवकास असेच फसवून लग्न केले. पाचव्या दिवशी तीने दागिणे, मोबाईल,पैसे, साड्या घेवून पलायन करून ती थेट औरंगाबादला पोहचली दुसर्या लग्नासाठी.
यावलच्या वराला आपली फसणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्याने यावल पोलिसात तक्रार नोंदविली. यावलचे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील,पीएसआय जिेंद्र खैरनार,सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी, पोलिस हवालदार भूषण चव्हाण, महिला कॉन्स्टेबल ज्योती खराटे यांनी तपास करून तीला औंरगाबाद येथून मुद्देमालासह ताब्यात घेतले.
तीच्याकडून माहिती घेत सोनाली कुर्हाडे, रा, दर्गा रोड, परभणी, सहकारी संशयीत आरोपी बहिणाबाई अंधारे, रा, दर्गा रोड परभणी,रावसाहेब कोळी व अनिल परदेशी रा. अकलूज ,ता. यावल यांना अटक केली आहे.
सोनाली नव्हे मंगला खरे नाव
यातील नववधु असलेली सोनाली कुर्हाडे ही वारंवर नाव बदलवत असे. आतापर्यंतच्या तपासात तीने तीचे नाव सोनाली कुर्हाडे, मंगला पवार, मंगलाबाई उर्फ सोनाली शिंदे अशी सांगितली आहेत. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात तीचे खरे नाव समजले. तीचे मूळ नाव मंगला आनंदा पवार, रा. आडगाव ता. यावल असे आहे.
तीने बारावीपर्यंतचे शिक्षण चिचोलीच्या शाळेून घेतले असल्याचा दाखला उपलब्ध आहे. तीने १५ वर्षापूर्वी चिंचोलीच्या एक युवकाशी लग्नाचा बनाव करून गाव सोडले होते. तेव्हाही पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. पण ती सापडत नव्हती. मात्र या विवाहाने तीचे सारे बिंग पोलिसांनी उघड केले आहे.