जळगावातील संगित क्षेत्रातील एक नामवंत नाव म्हणजे डॉ. संगिता म्हसकर. आता त्या पुण्यात स्थायीक झाल्या आहेत. शास्त्रीय गायनाचा वारसा बालपणापासून आणि तोही वडीलांपासून मिळाल्यांनंतर संगिता म्हसकर यांनी त्यातच करीअर करत पीएचडी पदवी प्राप्त केली.
शास्त्रीय गायनासोबत त्या उत्कृष्ट अशा कवयित्रीही आहेत. गझल गायनात जरा कठिणच. गझल लिहीता लिहीता त्या गझलेचे गायनही त्या करतात. अशीच त्यांची एक गझल वाट चुकल्या कातर संध्याकाळी…
स्वरतालाच्या वाटा चुकल्या कातर संध्याकाळी..
गाण्याच्या त्या ओळी लिहिल्या नव्हत्या तुझिया भाळी..
गडद सावळी झाली जेव्हा ..एकांताची छाया..
एक कवडसा घेउन आली पानांमधली जाळी..
अंधाराच्या लाटांवरती ..आठवणींच्या नावा..
जणू वेदना काळजावरी चांदण गजरा माळी..
नकळत घडली एक कहाणी चार क्षणांची अवघ्या..
व्यापुन माझ्या आयुष्याला झाली नामनिराळी..
किती खुलासे.. किती उसासे..जागत होतो दोघे..
बघता बघता रात्र कालची सरली काजळ काळी..!!
डॉ संगीता म्हसकर
पुणे