वाचनीय

क... कवितेचा : सण चार निमिषांचा.....

दिवाळी विशेष २०२०
November 12, 2020

सर्वाचा आवडता सण म्हणजे प्रकाशोत्सव. वर्षभर विविध कारणांनी बाहेर राहणारे या उत्सवास आर्वजून एकत्र येताता. चार दिवसात घर कसं गजबजून जाते. गोडधोड, मोठ्याचे हास्यविनोद, लहानग्यांची चिवचिवाट , सारे कसे आनंदीआनदच. हाच आनंद काव्यरूपात मांडत आहेत जळगावचे कवी विवेक चौधरी…. सण चार निमिषांचा या काव्यातून…

पडे अंगणात सडा, दारा सजली रांगोळी..
महाउत्सवाचा सण, आली आली हो दिवाळी..


दिवे पणत्यांचा सण, आणी आनंदाचे क्षण..
थोडी जीवाला उसंत, जरा सुखावते मन..


विखुरला गावोगावी, एक होई परिवार..
दीप सणाच्या निमित्तानं, गजबजे सुनं घर..


होई घरात ही गर्दी, आपल्याच माणसांची..
मग फराळात घडे, चर्चा सुखदुःखाची..


कुठे उकलती घड्या, नव्या दागिन्यांच्या..
कुठे ओलावती कडा, सुन्या पापण्यांच्या..


असे भेद थोडा, जरी गरीब श्रीमंतीचा..
तरी सारखाच हर्ष, वाही दिवाळी सणाचा..


सारी दुःखाचा अंधार, दीप उजळी नात्यांचा..
सण चार निमिषाचा , ठेवा देई परंपरेचा..


….. विवेक श्रावण चौधरी, जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts