वाचनीय

क.. कवितेचा.. माणुसकिना आधार

दिवाळी विशेष २०२०
November 12, 2020

खान्देश कन्या म्हटले की डोळ्यासमोर नाव येते ते बहिणाबाईंचे. बहिणाबाई पुस्तकी शाळा शिकल्या नाहीत. मात्र त्यांनी पुस्तके लिहायला लावलीत. जात्यावर दळण दळता दळता, शेतात काम करता करता त्या कविता करत गेल्या आणि त्याचे पूत्र सोपानदेव त्या कविला लिहीत गेले. म्हणूनच आम्हाला बहिणाबाईच्या अनुभव आणि निरीक्षणातील जीवनाच्या शाळेच्या कविता वाचायला मिळाल्यात.

बहिणाईंच्या कवितांचा आदर्श घेत धरणगावच्या मुसळी येथील शेतकरी कवी शरद पाटील यांचे अनुभव माणुसकिना आधार या कवितेतून शब्दकाव्य रूपबध्द झालेत. वाचू या काय म्हणतात ते…

नुसता टेकू लावणं तेले म्हणोका आधार
जो बिनभरोसना ऱ्हास वारसदार..


पाठ मांगे जो उभा त्याले म्हणो का आधार
तो पाठमा खंजर ऱ्हास खुपसनार..


साथ देणं त्याले म्हणो का आधार
तोच ऱ्हास मनन जानी चुगल्या लावणार..


हुशार लोकेसले म्हणो का आधार
त्याच ऱ्हातस ज्ञानना डोस पाजनार..


पैसा वालाले म्हणोका आधार
तोच ऱ्हास देशोधडे लावणार..


गणगोत आपल त्याले म्हणोका आधार
त्याच ऱ्हातस खांद्या हुई वाटेलावणार


मंग जीवनमान खरा तोच शे आधार
जो माणुसकीथून आपलेसे वागणार..


आपन बी माणुसकीले जागी हुई देखो कोना आधार
मंग खरंच दादा हो कस बरं नही जग सुधारणार..

✍️ – शरद एम पाटील,

मुसळी, ता.धरणगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts