वाचनीय

क.. कवितेचा... : दिवाळी सण

दिवाळी विशेष २०२०
November 12, 2020

कोरोना या संसर्गजन्य विषाणूमूळे जग कुलूपबंद होत. आता बर्‍यापैकी लॉकडाऊन शिथील झाले आहे. आता दिवाळी आली आहे. त्यामुळे कोरोना ते दिवाळी असा हा प्रवास भुसावळच्या कवयित्री राजश्री देशमुख सांगताहेत काव्य रूपातून…

दिवाळीचा सण

दिवाळीचा सण आला
दारी उजळती दिवे
आनंदाने नाचतात
बालगोपालांचे थवे
दिवाळीचा सण आला
इमारती ल्यातील विदयूतमाळा
बाळ मंडळींच्या मनी
फटाक्यांच्या लांब याद्या
लाडू करंजी चकली
फराळात कडबोळी


फिरत असे माऊली शोधत
आचारी गल्ली बोळी
लाडूस मुरडती नाके
कच्ची बच्ची सगळी
पुरणपोळीची जागा घेतली
चायनीज ने खरी
कोरोनामुळे ८ महिन्यात
नजरकैदेत वृध्द नी बाल मंडळी
पाकगृहात गुंतली मायमाऊली
तिळतीळ तुटल्या कित्येक माऊली
अन्नान्न दशेत ऊन्हाचे चटके
दिवाळं काढत राहिला कोरोना
चारी दिश्या अंधार. अत्याचार हाहाकार
भयभीत ह्रदया दिलासा कुठला?
वसुधैव कुटूंबकम संस्कृती आपली
रक्तातुन सळसळते का?
असेल तर आठवण ठेवा
प्रत्येक दारात रांगोळी
आणि प्रत्येक घरी ऊजळो शिकोरी.
तिच खरी दिवाळी !


….. राजश्री देशमुख, भुसावळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts