वाचनीय

कोवीड लसीकरणाचे प्रमाणपत्र सोशल मीडियावर टाकताय.. जरा सावधान...

ताज्या घडामोडी
May 26, 2021

हल्ली आपल्या किंवा इतरांच्या बाबत फारच संवेदनशिल झालेलो आहोत. आपली माहिती किंवा इतरांची माहिती पटकन मास मीडियापर्यंत पोहचवण्याची आपल्यास आणिबाणिची घाई असते. सबसे पहले मै च्या नादात सोशल मीडियावर काहीही पोस्ट करत असतो. आता हेच पाहाना कोविडची लस घेतांनाचे आणि मिळालेल्या प्रमाणपत्रांचे फोटो पटकन सोशल मीडियावर अपलोड केले जातात. पण जरा सावधान…. कारण यातून तुमची माहिती चोरीली जात असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हा इशारा कोणी एैर्‍यागैर्‍याने दिलेला नाही. तर चक्क केंद्र सरकारच्या सायबर दोस्त या वेबॲपने दिला आहे. काय आहे तो इशारा वाचाच या पोस्टमधून….

कोरोनाच्या संकटात सध्या अनेक आर्थिक व्यवहार हे ऑनलाईन केले जात आहेत. त्यामुळे अनेक सायबर चोरटे सावध झाले असून अशा व्यवहारांवर नजर ठेवत डल्ला मारून तुमचे बँक अकाऊंट खाली करत आहेत. यामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढलं आहे. एका चुकीच्या पोस्टमुळे सायबर गुन्हेगारांच्या हाती माहिती लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

देशातील नागरिकांनी अधिक स्मार्टपणे ऑनलाइन माध्यमांवर सजग रहावे म्हणून सरकारकडूनही वेळोवेळी सूचना आणि इशारे देण्यात येतात. सरकारने नुकताच करोना लसीच्या प्रमाणपत्रासंदर्भात असाच एक इशारा दिलाय.


सरकारने करोना लसीकरणानंतर देण्यात येणारं प्रमाणपत्र ऑनलाइन माध्यमांवर पोस्ट न करण्याचं आवाहन केलं आहे. या प्रमाणपत्रावर लस घेणाऱ्या व्यक्तीची बरीच खासगी माहिती असते. यात नाव, वय यासारख्या माहितीचा समावेश असतो. या माहितीच्या आधारे सायबर गुन्हेगार फसवणूक करु शकतात.

करोना लसीचा डोस घेतल्यानंतर लस घेणाऱ्या व्यक्तीला सरकारकडून लसीकरणाचं प्रमाणपत्र दिलं जातं. यामध्ये लसीकरणासंदर्भातील महितीबरोबरच इतर महत्वाची माहितीही असते. हे प्रमाणपत्र भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान लस घेतल्याचा पुरावा म्हणून कमी येऊ शकतं. कोवीन आणि आरोग्य सेतूवरुन हे प्रमाणपत्र डाऊनलोड करता येतं.


सरकारने सोशल नेटवर्किंगसंदर्भातील सूचना देण्यासाठी सुरु केलेल्या सायबर दोस्त या ट्विटर हॅण्डलवरुन हे प्रमाणपत्र सोशल नेटवर्किंगवर पोस्ट न करण्याचं आवाहन केलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत या सोशल दोस्त ट्विटर हॅण्डलचा कारभार पाहिला जातो.
करोना लसीकरणासंदर्भातील हे प्रमाणपत्र आणि फोटो सोशल नेटवर्किंगवर अपलोड करण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचं मागील काही काळापासून दिसून येत आहे.

एक मेपासून १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात झाल्याने अशा फोटोंची संख्या वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच भविष्यात या सोशल नेटवर्किंगवरील पोस्टचा त्रास होऊ नये म्हणून सरकारकडून हा इशारा देण्यात आलाय.


फोटो टाका पण प्रमाणपत्र नव्हे…


लसीकरण केंद्रांवर लस घेतल्यानंतर सेल्फी पॉंईट ठेवण्यात आला आहे. लसीकरण केलेले अनेकजण येथे सेल्फी घेत असतात. अशा सेल्फी इतरांना प्रेरणा व्हावी म्हणून सोशल मीडियावर टाकणे एक वेळ योग्य आणि कमी धोकेदायक आहे.

परंतू लसीकरणाचे मिळालेले प्रमाणपत्र टाकणे धोकेदायक आहे. त्यामुळे लसीकरणाचे फोटो टाका पण प्रमाणपत्र टाकू नका असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts