वाचनीय

कोरोना काळातही जगातील सर्वात मोठ कुंटूंब घेतय जगण्याचा मनमुराद आनंद…

ताज्या घडामोडी
May 28, 2021

कोरोना आणि लॉकडाऊमुळं लोकांना एकीकडं अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असताना जगातील सर्वात मोठं कुटुंब जगण्याचा मनमुराद आनंद घेत आहे. कोठे आहे हे कुटूंब आणि कोरोनाकाळातही कसे आनंदी राहत आहेत ते वाचा व त्यांचे फोटोही पाहा..

भारतातील मिझोराममध्ये राहणाऱ्या जिओना चाना यांच कुटुंब जगातील सर्वात मोठं कुटुंब मानलं जातं. या कुटुंबात एकूण 181 लोक आहेत. या घराचा प्रमुख चाना असून त्याच्या एकूण 39 बायका आहेत. या सर्व बायकांना मिळून 94 मुलं आहेत.चानाचं हे इतकं मोठं भव्य कुटुंब मिझोराममधील बटवंग गावात 100 खोल्यांच्या मोठ्या घरात राहतं.

या घरात एकूण 14 सुना आहेत. चाना यांना 33 नातवंड आहेत. 181 लोकांच्या या कुटुंबातील जास्तीत-जास्त महिलांचा वेळ हा जेवण बनवण्यातच जातो. या कुटुंबाचा सर्वात जास्त पैसा हा त्यांच्या खाण्या-पिण्यावरच खर्च होतो.

या कुटुंबाला एका दिवसात 100 किलो डाळ आणि तांदूळ लागतो. या हिशोब फक्त त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा आहे. नाष्ट्यासाठी रोज वेगवेगळे पदार्थ केले जातात, त्यासाठी लागणाऱ्या वस्तू वेगळ्याच आहेत.

एका वेळी या कुटुंबाला 40 किलो चिकन लागतं, त्याशिवाय भागतच नाही. तसेच चिकन नॉनवेज बनवण्यामध्ये त्यांचा जास्त वेळ जात असल्याने ते जास्तीत-जास्त शाकाहारी खाण्यावर भर देतात. घरात लागणारा जवळपास सर्व भाजीपाला घराशेजारीच पिकवला जातो, त्यामुळं बाजारात जाणाऱ्या पैशांचा खर्च वाचतो.

हे कुटुंब घराच्या अंगणात, आजूबाजूला शेतात पालक, कोबी, मोहरी, मिरची, ब्रोकोली इत्यादी भाजीपाला पिके घेतात. घरातील बागेमुळं या कुटुंबाच्या खूप पैशाची बचत होते. कुटुंबातील स्त्रिया या भाजीपाला पिकविण्याकडे लक्ष देतात. विशेष म्हणजे त्यासाठी नैसर्गिक खते वापरतात. या कुटुंबातील पुरुष लोक शेती आणि जनावरांचं पालन करतात. यातून मिळणाऱ्या पैशांवर या कुटुंबाचा उदरनिर्वाह मुख्यत्वे चालत.

पण लॉकडाऊनमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागल. अगोदर भाजीपाला आणि कुक्कुटपालनातून त्यांना चांगले पैसे मिळायचे, परंतु यावर सध्या लॉकडाऊनमुळं गदा आली.या महागाईच्या काळात इतकं मोठं कुटुंब कसं चालत असेल असा अनेकांना प्रश्न पडतो. या कुटुंबावर काही प्रेम करणारे लोक स्वता:हून देणगी देतात.

एका मुलाखतीत कुटुंब प्रमुखांनी सांगितलं होतं की, असे बरेच लोक आहेत जे आमच्या कुटुंबावर प्रेम करतात आणि आम्हाला देणगीही देतात. जिओना चाना हे 1942 मध्ये सुरू झालेल्या ख्रिश्चन ग्रुप चानाचे प्रमुख आहेत.

त्यांच्यामध्ये एकापेक्षा अनेक लग्न करण्यास परवानगी आहे. या समाजात आत्तापर्यंत 400 कुटुंबांची नोंद आहे. यांचा मुख्य उद्देश आहे की, जास्तीत-जास्त मुलं जन्माला घालून समाज मोठा करणे.
काय वाचकहो कसे वाटले चानाचे कुटूंब. पण चाना सारखा विचार करू नका बरे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts