वाचनीय

कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची होणार समीक्षा

ताज्या घडामोडी
October 22, 2020

पाकिस्थानच्या संसदेत विधेयक मंजूर

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्देशांचे पालन करत हेरगिरीच्या कारणावरून पाकिस्थानच्या तुरूंगात असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेच्या समीक्षेसाठी पाकिस्थानच्या संसदेत एक विधेयक मंजुर करण्यात आले आहे.

इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (समिक्षा आणि पुनर्विचार) अध्यादेश, असं या विधेयकाचं नाव आहे. या विधेयकाला पाकिस्तानच्या संसदेत (नॅशनल असेंब्ली) विरोधकांचा मोठा विरोध असतानाही कायदा आणि न्यायसंबंधी स्थायी समितीने चर्चा करुन मंजुरी दिली.

…तर पाकिस्तानवर आले असते आंतरराष्ट्रीय निर्बंध

संबंधीत समितीच्या चर्चेत भाग घेताना पाकिस्तानचे न्याय आणि कायदा मंत्री फरोग नसीम म्हणाले, “हे विधेयक आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी आणण्यात आले आहे. जर या विधेयकाला नॅशनल असेंब्लीमध्ये मंजुरी मिळाली नसती तर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयाचे पालन न करण्याबद्दल प्रतिबंधांचा सामना करावा लागला असता.

कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा

हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांखाली ५० वर्षीय माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सैन्य कोर्टानं एप्रिल २०१७ मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. भारताने पाकिस्तानच्या सैन्य कोर्टाच्या निर्णयाविरोधात आणि जाधव यांना कॉन्सुलेट अॅक्सेस (परराष्ट्रातील कायदेशीर मदत) देण्यास नकार देण्याविरोधात २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती.


आंतराष्ट्रीय कोर्टाकडून पुनर्विचार करण्याचे आदेश

हेग येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय कोर्टाने जुलै २०१९ मध्ये दिलेल्या निर्णयात पाकिस्तानने जाधव यांच्या शिक्षेबाबत समिक्षा आणि पुनर्विचार करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर कोर्टाने भारताला विनाविलंब जाधव यांच्यापर्यंत कायदेशीर मदत पोहोचवण्याचे आदेश दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts