वाचनीय

अरेच्च्या हे असेही होऊ शकते.... रेल्वेची चाके साखळदंडाने बांधली गेलीत ...

ताज्या घडामोडी
May 26, 2021

वस्तू चोरीला जाऊ नये म्हणून तीला एका जागेवर उभे करून कुलूपबंद करणे योग्य आहे. दुचाकी, चारचाकी, घरफोडून चोरी, माणसांसह प्राण्यांचे अपहरण समजण्यासारखे आहे. विमान, जहाज आणि रेल्वे यासारखी अनेक टन वजन असलेली वाहने चोरीस जाण्याची शक्यता तशी एक टक्क्काच. पण बंगालच्या हावडा येथे रूळांवर उभ्या असलेल्या रेल्वेची चाके चक्क साखळदंडांने बांधून कुलूपबंद करण्यात आले आहे. तुम्ही म्हणाल काय हा वेडेपणा… पण बातमी जेव्हा वाचाल पूर्ण तेव्हा तुम्हीही म्हणाल अरेच्च्या हे असेही होऊ शकते..


त्याचे असे आहे की, बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले ‘यास’ चक्रीवादळ बुधवारी सकाळपर्यंत ओडिशाच्या बालासोरजवळ धडकणार आहे. त्याचा सर्वाधिक फटका ओडिशा आणि प. बंगालला बसण्याची शक्यता आहे. रात्री उशिरापर्यंत वाऱ्याचा वेग ताशी १२० ते १३० किमी होता. तो वाढून ताशी १६० किमी होऊ शकतो.

बंगालमध्ये हावडाजवळील शालिमार स्टेशनवर उभ्या रेल्वेगाडीला इमर्जन्सी ब्रेकसोबतच चाकांमध्ये पुढे-मागे लोखंडी अडथळे लावण्यात आले आहेत. वाऱ्यामुळे रेल्वे पुढे जाऊ नये म्हणून चाकांना साखळदंडाने जखडून कुलूपही ठोकले आहे.

यावरून यास या वादळाचा वेग लक्षात येतो. वादळामुळे रेल्वेही ओढली जाण्याची शक्यता असल्याने चाके साखळदंड लावून कुलूपबंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता रेल्वेही कोरोनाकाळात स्टे ॲट होम किंवा क्वारंटाईन झाल्याचे गमतीने म्हटले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts